Home महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात ६३.७० टक्के मतदान तर दुसऱ्या टप्प्यात किती?  लोकसभा मतदान

राज्यात पहिल्या टप्प्यात ६३.७० टक्के मतदान तर दुसऱ्या टप्प्यात किती?  लोकसभा मतदान

Breaking News | Lok Sabha Election 2024: लोकसभा मतदान पहिल्या टप्प्यात राज्यात ६३.७० टक्के मतदान झाले तर आकडेवारीनुसार आठ मतदारसंघांत ५३.७० टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 How much is the voting in the second phase

Lok Sabha Election 2024: राजकीय धुमश्चक्रीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या महाराष्ट्रात आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यात ६३.७० टक्के मतदान झाले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यात मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या अंदाजे आकडेवारीनुसार आठ मतदारसंघांत ५३.७० टक्के मतदान झालेले आहे.

एकूण मतदानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ही वाढ फारशी नसणार असून ती पाहता मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. उन्हाचा कडाका, लग्नसराई आणि राज्यातील राजकीय खिचडी यामुळे मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसत आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५३.७० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये वर्धा- ५६.६६ टक्के, अकोला- ५२.४९ टक्के, अमरावती- ५४.५० टक्के, बुलढाणा- ५२.२४ टक्के, हिंगोली- ५२.०३ टक्के, नांदेड- ५२.४७ टक्के, परभणी- ५३.७९ टक्के, यवतमाळ-वाशिम ५४.०४ टक्के एवढे मतदान झाले आहे.

तर देशातील ८८ मतदारसंघांत सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. तर पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांत ६५.५ टक्के मतदान झाले आहे. मतदान कमी झाले आहे. उष्णतेचा फटका मतदानावर झाला आहे असे बोलले जाते. तर कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे कोणाच्या तोट्याचे याची चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 How much is the voting in the second phase

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here