Home अहमदनगर अहमदनगर धक्कादायक!  तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

अहमदनगर धक्कादायक!  तरुणीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

Breaking News | Ahmednagar: लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघडकीस आली.

Kidnapping and sexually assaulting a young woman

कोपरगाव: कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेला आरोपी अभिषेक वसंत कनगरे याने येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघडकीस आली आहे.  यातील आरोपी तालुक्याच्या पूर्व भागातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील असल्याची खात्री लायक माहिती हाती आली आहे.

दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिला आरोपी हा रामवाडी संवत्सर येथील असून त्याचे नाव तेजस सतीश शेटे (वय-२० वर्षे) असून दुसरा आरोपी हा भोजडे गावातील असून त्याचे नाव स्वप्नील भारूड असे आहे. तर तिसरा आरोपी हा भोजडे चौकी येथील असून त्याचे नाव प्रतीक शरद शिनगर (वय-१७) आहे तर अन्य अज्ञात ०४ आरोपी अज्ञात असल्याची माहिती आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान सदर गुन्हा हा आधी सदर मुलीचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याचा तिच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला होता. मात्र तिचा शोध घेताना पोलिसांनी एक पथक नेमले होते. त्यात सदर मुलीचा शोध घेतला होता त्यांनतर त्यांनी तिचा जबाब नोंदवला असता वरील घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान यातील आरोपींनीं यात पीडित अल्पवयीन मुलीस लौकी शिवारात दि. २० एप्रिल रोजी रात्री ०९ वाजेच्या नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर दि. २१ एप्रिल रोजी शिर्डी येथील एका हॉटेल पुन्हा हा प्रकार घडला आहे. तर दि.०१ मे रोजी रात्री १० वाजता व दि.०४ मे रोजी पून्हा एकदा अ.नगर येथील हॉटेल वर त्याची पुनरावृत्ती घडली असल्याची माहिती माहितगार सूत्रांकडून हाती आली आहे. यात एक अनोळखी मोटार सायकलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस अधिकारी शोध घेत आहे.

दरम्यान यातील अल्पवयीन पीडित मुलीच्या जबाबावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी कलम वाढवले असून भा.द.वि. कलम ३७६,३७६ (२), (एन), ३७६(३), ३६६ (अ), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम-२०१२ चे कलम ४,६,८, प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान यातील प्रतीक सिनगर यास पोलिसांनी अटक केली असून तो अल्पवयीन असल्याने त्यास नगर येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर अन्य दोन आरोपी तेजस सतीश शेटे आणि स्वप्नील भारूड यांना अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास आगामी १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर अन्य चार आरोपींचा पोलीस अधिकारी शोध घेत आहे.

Web Title: Kidnapping and sexually assaulting a young woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here