गोदावरी नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला
Breaking News | Ahmednagar: तरुण पाण्यामध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झाला असल्याची घटना. अथक प्रयत्नानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडण्यास प्रशासनाला यश.
कोपरगाव: दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी-हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५ ) हे काल सकाळच्या सुमारासं नदीमध्ये गेले असता पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष भिमाशंकर तांगतोडे हा तरुण पाण्यामध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झाला असल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्य दुसऱ्या दिवशी देखील तहसीलदार संदिपकुमार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सुरु असताना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडण्यास प्रशासनाला यश आले आहे.
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी-मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल भिमाशंकर तांगतोडे (वय ३०), प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (वय २८) व नारायण भिकाजी तांगतोडे (वय ५२) हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याने मोटारी काढण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार शेतकऱ्यास निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची नेसलेली साडी सोडून तरूणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवण्यात त्याना यश आले. त्यात संतोष हा तरुण वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Web Title: body of ‘that’ young man who was washed away in Godavari river was found
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study