Home अकोले अकोले: रस्त्याच्या कडेला नालीत आढळला तरुणाचा मृतदेह

अकोले: रस्त्याच्या कडेला नालीत आढळला तरुणाचा मृतदेह

Breaking news | Akole: रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या नालीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

young man's Dead body was found in a drain on the side of the road

राजूर : अकोले तालुक्यातील कोल्हार- घोटी रस्त्यावरील कातळापूर शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या नालीत सोमवारी सकाळी इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कातळापूर शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या नालीत एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिस पाटील अनंत शंकर ढगे यांनी राजूर पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मयत तरुणाच्या अंगात असलेल्या टी शर्टवरील नावावरून मयत तरुणाचा शोध लावणे पोलिसांना सोपे झाले. या मिळालेल्या माहितीवरून मयत तरुणाचे नाव धोंडीराम संतू शिळकंदे असून ते कातळापूर येथे दोन दिवसांपूर्वी लग्नासाठी आले होते. ते लग्नाहून घरी जाण्यासाठी निघाले, मात्र घरी पोहोचण्याऐवजी त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे मयत धोंडीराम यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, कर्मचारी करीत आहेत.

Web Title: young man’s Dead body was found in a drain on the side of the road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here