Home संगमनेर संगमनेर: शेत जमिनीच्या वादातून महिलेला कुऱ्हाडीने मारहाण – गुन्हा दाखल

संगमनेर: शेत जमिनीच्या वादातून महिलेला कुऱ्हाडीने मारहाण – गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: शेताच्या बांधावर काम करीत असतांना आरोपींनी एकटी महिला पाहून तिला कुऱ्हाडीने, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी.

woman was beaten with an ax due to a farm land dispute Crime Filed

संगमनेर: धांदरफळ- शेत जमिनीच्या वादातून वारंवार त्रास देऊन अपमानित करणे, दमदाटी करणे असा प्रकार केला जात असतांना गुरूवार २५ रोजी शेताच्या बांधावर काम करीत असतांना आरोपींनी एकटी महिला पाहून तिला कुऱ्हाडीने, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना तालुक्यातील धांदरफळ बु. येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. मंदाबाई संजय बिबवे (वय ४८ वर्षे, धंदा शेती व घरकाम रा. कार मळा धांदरफळ बु. ता संगमनेर) यांनी संगमनेर शहरातील कुटे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असतांना लेखी जबाब दिला. यात त्यांनी म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी माझे पती संजय नारायण बिबवे, मुलगा अविनाश, मुलगी प्रियंका असे एकत्र राहतो. आमचे राहते घराजवळ सर्व्हे नं २६३/३ मध्ये १ एकर क्षेत्र असलेल्या ओड्या समोर दामोधर पढरीनाथ हासे यांची शेत जमिन आहे. त्यांची मुले गोकुळ, दत्तात्रय व नातु प्रविण असे काहीही कुरापत काढुन आमच्याशी भांडण करीत असतात. दरम्यान दि.२५/४/२०२४ रोजी सायंकाळी मी आमचे शेतावरील बांधावर असलेले सरपण कुऱ्हाडीने तोडत असतांना गोकुळ दामोधर हासे हा माझे जवळ आला व मला म्हणाला तु आमचे शेताचे बांधावरील सरपण का तोडत आहेस असे म्हणुन शिवीगाळ करु लागला. तेव्हा मी त्यास म्हणाली मी आमचे बांधावरील सरपण तोडत आहे. या बोलण्याचा त्याला राग आल्याने त्याने माझी साडी ओढुन आता तुला नग्रच करतो असे म्हणुन माझे हातातील कुऱ्हाड घेवुन माझे डावे पायाचे पोटरीवर मारुन गंभीर जखमी केले. तेव्हा त्याचा भाऊ दत्तात्रय व भाचा) प्रविण माझेकडे पळत आले. त्यावेळी दत्तात्रय याचे हातात लोखंडी रॉड व पुतण्या गोकुळ, प्रविण याचे हातात लाकडी दांडके होते. तेव्हा दत्तात्रय याने लोखंडी रॉडने माझे डावे खांद्यावर व हातावर मारुन गंभीर जखमी केले. व प्रविण याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर मारुन जखमी केले. यावेळी मला गोकुळ म्हणाला, बोलाव तुला कोणाला बोलवायचे ते त्यांचा आता बेतच बघतो. असे म्हणुन मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवु लागला. माझा आरडाओरडा ऐकुन माझा भाऊ मल्हारी चंद्रभान अरगडे व इतर इसम हे माझेकडे पळत आले, तेव्हा ते तेथून पळुन गेले. नंतर माझा भाऊ मल्हारी व मुलगा अविनाश यांनी मला तात्काळ ग्रामिण रुग्णालय संगमनेर येथे घेवुन आले. या हाणामारीत सदर महिलेच्या डावे हाताला, व पायाला फॅक्चर झाले आहे. या प्रकरणी गोकुळ दामोधर हासे, दत्तात्रय दामोधर हासे, प्रविण दत्तात्रय हासे सर्व रा. धांदरफळ बु।। ता संगमनेर यांचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात ३२६, ३५४, ३२४, ५०४, ५०६, ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: woman was beaten with an ax due to a farm land dispute Crime Filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here