Home अकोले अकोले: वीज शॉर्ट सर्किटने घराला आग,आगीत गॅस टाकीचा स्फोट, घर जळून खाक

अकोले: वीज शॉर्ट सर्किटने घराला आग,आगीत गॅस टाकीचा स्फोट, घर जळून खाक

Breaking News | Akole: घर जळून खाक, दुर्घटनेत  जीवितहानी नाही पण साहित्यासह घर आगीत भस्मसात, कुटुंब उघड्यावर.

House on fire due to electrical short circuit, gas tank explosion

अकोले:कोले तालुक्यातील पागिरवाडी  मुथाळणे येथील पोपट  बंडू  हळकुंडे यांचे राहते घर मंगळवार दिनांक ३० एप्रिल  रोजी  पहाटे १  वाजता   वाजण्याच्या सुमारास आग लागली. विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागून  गॅस टाकीचा स्पोट झाला.स्पोट  इतका भीषण होता की काही कळण्याच्या आत घराला लागलेल्या आगीने  पूर्ण घर जळून खाक झाले.घराला आग लागली त्या वेळेस हळकुंडे कुटुंब उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते.घराला लागलेल्या आगीने गॅस टाकीचा स्पोट झाला.  सर्व कुटुंब झोपेतून जागे झाले.तसेच शेजारी असलेले कुटुंबातील सदस्य आणि काही वेळातच पागिरवाडी सर्व गाव घर विझवण्यासाठी मदतीला आले.घरातील बांधलेली जनावरे या लागलेल्या आगीतून अत्यंत शिताफीने बाहेर काढण्यात आली.मात्र घराला लागलेली आग इतकी प्रचंड मोठी होती की,आगीत पूर्ण घर जळून खाक झाले.

अकोले येथून अग्निशामक बंब बोलवण्यात आला.मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.महसूल विभागाचे तलाठी यांनीही सकाळी घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे मान्य केले आहे.मात्र शासकीय मदत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल.मात्र माणुसकीच्या नात्याने हळकुंडे कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू ,धान्य ,कपडे,रोख स्वरूपात मदत करावी. पोपट बंडू हळकुंडे  यांचे आई – वडील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.त्यांचे मोठे भाऊ यांचेही एक दुर्धर आजाराने निधन झाले आहे.हळकुंडे  कुटुंब आपली जिरायत शेती आणि मोल मजुरी करत जगत आहे.तेव्हा आपण आपल्याला जी मदत करता येईल.ती मदत करावी असे आवाहन समस्त पागिरवाडीकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: House on fire due to electrical short circuit, gas tank explosion

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here