Home अहमदनगर अहमदनगर: झाडाखाली आढळला बेवारस मृतदेह

अहमदनगर: झाडाखाली आढळला बेवारस मृतदेह

Breaking News | Ahmednagar: चौफुली जवळील झाडाखाली एक बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आला.

dead body of Isma was found under a tree

राहाता: राहाता तालुक्यातील केलवड येथील शिर्डी बायपासच्या चौफुली जवळील झाडाखाली एक बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आला. केलवड येथील बायपास चौफुली जवळ झाडाखाली एक अनोळखी ५७ वर्षीय इसम बेशुध्द अवस्थेत आढळून आला. त्यास उपचारासाठी राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याबाबत कळविले. यावरुन राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजि. ३०/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे १० मे २०२४ रोजी मेडिकल ऑफिसर राहाता ग्रामीण रुग्णालय यांच्या खबरीवरुन दाखल केला आहे.

मयत हा अंगकाठीने मजबूत, अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ बाह्याचा शर्ट व गर्द जांभळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेला, चेहेरा गोल व सावळ्या रंगाचा इसम, दाढी काळी पांढरी, केस वाढलेले, नाक सरळ, कपाळ मध्यम, उंची ५ फुट असे मयताचे वर्णन आहे. सदर वर्णनाच्या व्यक्ती विषयी कोणाला काही माहिती अथवा ओळखीचा असल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस हेड कॉन्स्टेंबल एस. बी. नरोडे यांनी केले आहे.

Web Title: dead body of Isma was found under a tree

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here