Home राष्ट्रीय मोदी अमित शाहांना पंतप्रधान बनवतील – केजरीवाल

मोदी अमित शाहांना पंतप्रधान बनवतील – केजरीवाल

Breaking News | Loksabha Election: लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली तर नरेंद्र मोदी हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अमित शाह यांना पंतप्रधान बनवतील.

Modi will make Amit Shah PM - Kejriwal

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक भाजपने जिंकली तर नरेंद्र मोदी हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून अमित शाह यांना पंतप्रधान बनवतील. तसेच येत्या दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राजीनामा देतील, असे भाकित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केले. नरेंद्र मोदी पुढील वर्षी १७ सप्टेंबरला ७५ वर्षांचे होतील. तेव्हा भाजप त्यांना राजकारणातून निवृत्त करणार काय? असा सवाल केजरीवालांनी केला. नरेंद्र मोदी हुकूमशहा बनू इच्छित असल्याचा प्रहार केजरीवाल यांनी केला. पण नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.

दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्यधोरण संबंधित हवालाकांडप्रकरणी तब्बल ३९ दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे (आप) ५५ वर्षीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनी दिल्लीत रोड शो घेतला. हनुमान मंदिरात त्यांनी पत्नीसोबत माथा टेकवत प्रार्थना केली. आपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांपुढे २१ मिनिटे भाषण देत केजरीवाल यांनी भाजप व मोदींवर चौफेर हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले की, आम आदमी पक्षाला १० वर्षे पूर्ण झाली. पण आमच्या पक्षाला संपवण्यात नरेंद्र मोदी यांनी कोणतीही कसर सोडली नाही. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, संजय सिंह व मला तुरुंगात डांबले. तरीही आमच्या पक्षाचा दबदबा कमी झाला नाही. याउलट नरेंद्र मोदींनी भाजपमध्ये चोर, दरोडेखोरांना स्थान दिले. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना मंत्री व उपमुख्यमंत्री बनवले. तरीही मोदी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा आव आणत आहेत. देशाला लहान बाळ समजू नये, अशी टीका केजरीवालांनी केली. आम्ही भ्रष्टाचाराला चाप लावला. पंजाबमध्ये लाचखोर मंत्र्याची हकालपट्टी केली. भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही सीबीआयकडे सोपवले. त्यामुळे भाजपने आमच्याकडून बोध घ्यावा, असे केजरीवाल म्हणाले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, शिवराज सिंह, वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर, रमण सिंह यांचे राजकारण मोदींनी संपवले. आता पुढील नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन वन लीडर’ धोरण अंगिकारले. सर्वच नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. स्वतः हुकूमशहा बनण्याचा मोदींचा मानस आहे. भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली तर ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, पिनरई विजयन, उद्धव ठाकरे व सर्व विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात जातील, असा आरोप केजरीवालांनी केला.

Web Title: Modi will make Amit Shah PM – Kejriwal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here