भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांच्या कारला अपघात
Accident News | राजस्थान: आज राजस्थानमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. हा अपघात लालसोट कोटा महामार्गावर सुरवाल ठाण्याजवळ घडला.
या अपघातात मोहम्मद अझरूद्दीन हे बालंबाल बचावले आहे. अझरूद्दीन हे कुटुंबांसमवेत रणथांबोर येथे येत असताना अपघात घडला.
मोहम्मद अझरूद्दीन यांच्या कारच्या टायर निघाल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला. टायर निघाल्याने कार रस्त्याशेजारी असलेल्या धाब्यामध्ये घुसली. यात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र धाब्यावर काम करत असलेला ४० वर्षीय युवक हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. या अपघाताची चौकशी पोलिसांनी सुरु केली होती.
Web Title: Accident News Mohammad Azharuddin Car