Home अहमदनगर Accident | ट्रॅक्टर पाटामध्ये उलटून अपघात, एक ठार एक जखमी

Accident | ट्रॅक्टर पाटामध्ये उलटून अपघात, एक ठार एक जखमी

Accident One killed, one injured in tractor overturn

Nevasa | नेवासा: नेवासा तालुक्यातील कारेगाव ते रांजणगाव जाणारे पाटाच्या रस्त्यावर ट्रॅक्टर पाटामध्ये उलटून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये नितीन हरिभाऊ माळी (वय २२ वर्ष) याचा मृत्यू झाला तर चालक जखमी झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सुशांत अनिल वाळुंजकर यांचे विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ सावळेराम माळी (वय ५५ वर्ष) धंदा शेती रा.माळीचिंचोरा, ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीत म्हटले,  दि. १० जून २०२२ रोजी १० वाजेचे सुमारास मी माझ्या शेतातील कामासाठी रा.माळीचिंचोरा शिवारात हनुमंत सुधाकर वाकुंजकर रा. कारेगाव ता. नेवासा याचे मालकीचा ट्रॅक्टर बोलवला होता. त्यावेळी ट्रॅक्टरवर चालक म्हणून सुशांत वाळुंजकर हा होता.

तो स्वतः ट्रॅक्टर चालवित होता. त्याने परत जाताना माझ्या मुलगा नितीन हरिभाऊ माळी (वय २२ वर्ष) रा. रा.माळीचिंचोरा, ता.नेवासा यास ट्रॅक्टरवर ड्रायव्हरच्या बाजूस असलेल्या सिटवर बसविले. थोड्या वेळाने साईनाथ अहिरे याने फोन करून सांगितले. कारेगाव ते रांजणगाव जाणारे पाटामध्ये ट्रॅक्टर उलटला आहे व ट्रॅक्टरखाली तुमचा मुलगा व एक इसम जखमी झाला आहे.

त्यावेळी माझा मुलगा गंभीर अवस्थेत जखमी होता. तसेच ट्रॅक्टरवरील चालक सुशांत वाळुजकर हा देखील गंभीर जखमी होता. वाहनातून माझ्या जखमी मुलास व ट्रॅक्टर चालक यास वडाळा मिशन हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टर यांनी चालक सुशांत वाळुंजकर यास उपचारासाठी दाखल करुन घेतले व माझ्या मुलास गंभीर मार लागल्यामुळे त्यास पुढील उपचारकामी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले असता मी माझ्या मुलास घेऊन ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल केले.

तेथील डॉक्टरानी तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात चालक सुशांत अनिल वाळुंजकर यांचे विरुध्द गु.र.नं. ४८०/२००२ भादंवि कलम ३०४(अ), ३२८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Accident One killed, one injured in tractor overturn

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here