Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टेम्पो चालकाला मारहाण करून लुटले

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टेम्पो चालकाला मारहाण करून लुटले

Tempo driver beaten and robbed on Nashik-Pune highway

Sangamner | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर फाटा येथे एका ट्रक चालकाने मालवाहू टेम्पो चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याच्या खिशातील १२ हजार रुपये (Robbed) काढून घेतले. गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी रवींद्र आगलावे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळवाडी पठार येथील रवींद्र आगलावे हे नाशिक येथून टेम्पो घेऊन संगमनेर मार्गे चाकणला जात होते. गुरुवारी रात्री बाळेश्वर फाटा येथे आले असता आगलावे यांच्या टेम्पोसमोरील ट्रक चालक हा वेडीवाकडे वळणे घेत पुणेच्या दिशेने जात होता. त्यावेळी टेम्पो चालकाने होर्न वाजविला. त्यावेळी ट्रक चालक असलेला भय्या याने आगलावे यास शिवीगाळ करून लोखंडी रॉड डोक्यात मारून त्याच्या खिशातील १२ हजार रुपये काढून घेतले. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोंधले हे करीत आहे.  

Web Title: Tempo driver beaten and robbed on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here