Home अहमदनगर जीवे मारण्याची धमकी दिल्याने साई संस्थान कर्मचाऱ्याची आत्महत्या

जीवे मारण्याची धमकी दिल्याने साई संस्थान कर्मचाऱ्याची आत्महत्या

Sai Sansthan employee commits suicide by threatening to kill

Ahmednagar | Shirdi | शिर्डी: उसनेवारीने दिलेले पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिल्याने शहरातील श्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ११ जणांची नावाची चिट्ठी लिहून ठेवली होती. विकास रामचंद्र दिवटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.  

मयत विकास दिवटे (वय ३७) रा. हौसिंग सोसायटी, निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी हा साईसंस्थानच्या बगीच्या विभागात काम काम करत होता. याने गुरुवार दि. ९ जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मयत विकास याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आपल्या मित्रांना तसेच इतरांना मिळून ११ जणांना लाखो रुपये उसनवार दिले असल्याचे म्हटले आहे. तसेच या चिठ्ठीत नावे आणि मोबाईल नंबर लिहून ठेवले आहे. मयत विकास यास धमकी दिल्याचेही मोबाईलमध्ये नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून सामनेवाल्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मयत विकासच्या नातेवाईकांनी घरामध्ये मृतदेह झाकून ठेवला होता. याची माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना समजताच त्यांनी मयताच्या नातेवाईकांना आरोपींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मयत विकास याचा अंत्यविधी करण्यात आला.

Web Title: Sai Sansthan employee commits suicide by threatening to kill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here