Home Ahmednagar Live News Accident: टेम्पोने मोटारसायकला समोरून धडक दिल्याने अपघात, एक ठार

Accident: टेम्पोने मोटारसायकला समोरून धडक दिल्याने अपघात, एक ठार

Accident, one killed when the tempo hit the motorcycle in front 

Ahmednagar | पारनेर| Parner:  भरधाव वेगात जाणार्‍या मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुपा ते वाळवणे रोडवर बुधवारी (दि. 4) रात्री घडली.या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. (Parner Accident News)

रोहिदास यशवंत थोरात (वय 70, रा. वाळवणे, ता. पारनेर) असे या अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत थोरात हे हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरून सुप्याहून पुणे – अहमदनगर महामार्गावरून वाळवणे गावाकडे जात असताना वाळवणेकडून सुप्याच्या दिशेने जाणार्‍या टेम्पोने खिंडीजवळ मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली.

या अपघातात थोरात हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. याबाबत सुरेश रावसाहेब थोरात (रा. वाळवणे, ता. पारनेर) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी टेम्पो चालक आनंद बाळासाहेब वरकड (रा. देऊळगावसिद्धी, ता. अहमदनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Accident, one killed when the tempo hit the motorcycle in front 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here