Home परभणी आई वडिलांच्या मृत्यूनंतर चुलत्याने सांभाळले मात्र मोबदल्यात पुतणीवर केले अत्याचार

आई वडिलांच्या मृत्यूनंतर चुलत्याने सांभाळले मात्र मोबदल्यात पुतणीवर केले अत्याचार

death of his parents, he was taken care of by his cousin, but in return he abused 

परभणी | Parbhani: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एका गावात पुतणीला हाकलून देण्याची धमकी देत चुलत्यानेच अडीच वर्ष अत्याचार (abused) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी घरातून पळून आलेली पिडीत मुलगी परभणी येथील रेल्वे स्थानकावर एकटीच थांबली होती. या मुलीविषयी चाइल्ड लाईनच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर चाइल्ड लाईनचे पथक व पोलीस यांच्या मदतीने ने मुलीशी संपर्क साधण्यात आला. तिला चाइल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले. तिचे समुपदेशन केले. तेव्हा तिने चाइल्ड लाईन जवळ घडलेला प्रकार कथन केला.

मुलीचे आई वडील मयत झाल्याने ती आजी आजोबांकडे राहत होती. आजी आजोबा मयत झाल्यानंतर तिच्या काकाकडे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात काकाकडे मुलीला सपुर्द करण्यात आले. त्याठिकाणी ५ डिसेंबर १०१९ पासूनचुलत्याने मुलीवर बळजबरीने वारंवार अत्याचार केले. कोणाला काही सांगितले तर घरातून हाकलून देईल अशी धमकी पिडीत मुलीला देण्यात आली. मात्र त्यासाठी घरात त्रासही दिला जात होता. त्यामुळे मुलीने तेथून पळ काढत परभणी गाठले. चाइल्ड लाईनचे पथकाच्या मदतीने तक्रार नोंदविण्यात आली.

Web Title: death of his parents, he was taken care of by his cousin, but in return he abused 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here