Home महाराष्ट्र धक्कादायक! राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी थकविले लाखो रुपयांची वीज बिलं

धक्कादायक! राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनी थकविले लाखो रुपयांची वीज बिलं

ministers and MLAs in the state have exhausted electricity bill 

मुंबई | Electricity Bill: राज्यातील वीज बिल बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक मंत्री आणि आमदारांनी लाखो रुपयांची वीज बिलं थकवल्याची बाब समोर आली आहे. या थकबाकीदार ‘व्हीआयपी’ ग्राहकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आमदार, खासदारांसह मंत्री अशा जवळपास ३७२ ग्राहकांची १ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड आली आहे.

सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचं एक-दोन महिन्याचं घरगुती वीज बिल थकलं तरी, संबंधित विभागातील महावितरण कार्यालयाकडून वीज कनेक्शन बंद केलं जातं. मग आता थकबाकीदार आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे वीज कनेक्शन कापण्यात महावितरण तत्परता दाखवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणाचे किती वीज बिल थकीत आहे त्याची यादी

नाव किती वीजबिल थकवले

आरोग्यमंत्री राजेश टोपे- ४ लाख रुपये

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- १० हजार रुपये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले- २ लाख ६३ हजार रुपये

राज्यमंत्री विश्वजित कदम- २० हजार रुपये

श्रीमंत युवराज संभाजीराजे- १ लाख २५ हजार

माजी मंत्री सुभाष देशमुख- ६० हजार रुपये

भाजप आमदार जयकुमार गोरे- ७ लाख रुपये

माजी गृहमंत्री अनिल देशमुख – २ लाख २५ हजार

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे – ७० हजार रूपये

आमदार समाधान आवताडे- २० हजार

आमदार राजेंद्र राऊत, बार्शी- ३ लाख ५३ हजार रूपये

आमदार बबनराव शिंदे व त्यांचे

आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांचे २२ कनेक्शन – ७ लाख ८६ हजार रुपये

आमदार प्रकाश सोळंके- ८० हजार रुपये

आमदार संदीप क्षीरसागर- २ लाख ३० हजार रुपये

राज्यमंत्री संजय बनसोडे- ५० हजार रुपये

आमदार अशिष जयस्वाल- ३ लाख ३६ हजार रुपये

आमदार महेश शिंदे- ७० हजार रुपये

खासदार रणजितसिंह निंबाळकर – ३ लाख रुपये

आमदार संग्राम थोपटे- १ लाख रुपये

माजी खासदार प्रतापराव जाधव- १ लाख ५० हजार रुपये

शिवसेना आमदार सुहास कांदे- ५० हजार रुपये

आमदार रवी राणा – ४० हजार रुपये

आमदार वैभव नाईक – २ लाख ८० हजार रुपये

माजी मंत्री विजयकुमार गावित- ४२ हजार रुपये

माजी आमदार शिरीष चौधरी- ७० हजार रुपये

मंत्री संदीपान भुमरे- १ लाख ५० हजार रुपये

खासदार रजनीताई पाटील- ३ लाख रुपये

माजी मंत्री सुरेश खाडे – १ लाख ३२ हजार रुपये

सुमन सदाशिव खोत- १ लाख ३२ हजार रुपये

Web Title: ministers and MLAs in the state have exhausted electricity bill 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here