Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: टँकरने दुचाकीवरील पती पत्नीला चिरडले, दोघे ठार

अहमदनगर ब्रेकिंग: टँकरने दुचाकीवरील पती पत्नीला चिरडले, दोघे ठार

Ahmednagar Accident: टँकर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये पती पत्नी ठार झाले तर टँकर चालक पसार झाला आहे.

Accident Tanker crushes husband and wife on two-wheeler, both killed

अहमदनगर: टँकर-दुचाकीची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले असल्याची घटना आज नगर-कल्याण महामार्गावरील बायपास चौकाजवळ घडली.

दत्तात्रय उत्तरेश्वर झळके आणि सुवर्णा दत्तात्रय झळके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत.

कल्याण बायपास चौकाजवळ दुचाकीवरून जात असताना दाम्पत्य गाडीवरून पडून टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दाम्पत्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. टँकर चालक फरार झाला आहे.

Web Title: Accident Tanker crushes husband and wife on two-wheeler, both killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here