सैराटमधील त्या कलाकारास पोलिसांनी घेतलं ताब्यात
Suraj Pawar: चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात.
Suraj Pawar: सैराट चित्रपटातील कलाकार सुरज पवार यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुट करणाऱ्या आरोपींचा राहुरी पोलीस तपास करीत आहे. त्याअनुषंगाने सुरज पवार याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंत्रालयात नोकरीला लावून देतो असे आमीष दाखवून नगर जिल्ह्यातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची लाखों रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींच्या नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. फसवणुकीसाठी त्यांनी राजमुद्रेचा देखील गैरवापर केल्याच समोर आलं होत.
या प्रकरणातील धक्कादायक म्हणजे सैराट चित्रपटातील प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याचे देखील नाव समोर आले होते. त्यामुळं पोलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. आज पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सूरज पवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दरम्यान चौकशीनंतर गुन्हात सहभाग आढळल्यास सुरज पवारला अटक ही होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: Suraj Pawar artist from Sairat was taken into custody by the police