Home औरंगाबाद अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार घटनेने खळबळ

Aurangabad Crime: १६ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची धककादायक घटना.

minor girl was abducted and rape

औरंगाबाद: घरातून पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेलेल्या १६ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धककादायक घटना औरंगाबाद छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून भरदिवसा 19 वर्षीय तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये आणखी एक धक्कदायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात 21 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय मुलगी पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेली ती परत आली नसल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर मुलगी आकाश कांबळे या तरुणासोबत जाताना आढळली.

त्या तरुणाची ओळख पटवून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीसह मुलीला शोधून काढले. आरोपीची चौकशी केल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले यानुसार छावणी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: minor girl was abducted and rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here