टेम्पो आणि मॅजिकचा समोरासमोर भीषण अपघातात ४ ठार
सीताखांडी घाटात एका टेम्पो व मॅजिकच्या झालेल्या भीषण अपघातात (Accident) मॅजिकमधील चार जण जागीच ठार.
भोकर | नांदेड: तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सीताखांडी घाटात एका टेम्पो व मॅजिकच्या झालेल्या भीषण अपघातात मॅजिकमधील चार जण जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
सीताखांडी घाटात नांदेडकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिकला जबर धडक दिली. या अपघातात भुलाबाई गणेश जाधव (४५), संदीप किशनराव किसवे (२६), संजय इरबा कदम (४८), बापूराव रामसिंग राठोड (५७) यांचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: Accident Tempo and Magic head-on collision kills 4
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App