Home क्राईम धक्कादायक! सोशियल मेडीयात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

धक्कादायक! सोशियल मेडीयात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

Latur Crime: ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार  (sexual abused) केल्याची घटना.

sexual abused threatening to make the photo viral on social media

लातूर:  काढलेले फोटो साशेल मीडियात व्हायरल करतो, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार  (rape)केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीला शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले, लातुरातील एका वसतिगृहात पीडित मुलगी वास्तव्याला होती. दरम्यान, सोलापूर येथील इब्राहिम सादीक लोहारे (वय १९) याने जुन्या ओळखीच्या आधारे मुलीशी जवळीकता साधली. एप्रिल २०२३ मध्ये त्याने परिचय झाल्यानंतर विविध प्रलोभणे दाखविली. आरोपीही लातुरात वास्तव्याला असल्याने त्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे फोटो काढले आणि नंतर तिला ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी दिली. या माध्यमातून त्याने पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्याला सुरुवात केली. अखेर हतबल झालेल्या मुलीवर आरोपी इब्राहिम लोहारे याने एप्रिल ते जून २०२३ या काळात अनेकदा तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत धाडस करत पीडित मुलीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इब्राहिम सादिक लोहारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक (Arrested)  केली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: sexual abused threatening to make the photo viral on social media

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here