Home अहमदनगर अहमदनगर: तलवारीने वार करीत तरुणाचा खून, खळबळजनक घटना

अहमदनगर: तलवारीने वार करीत तरुणाचा खून, खळबळजनक घटना

Ahmednagar Murder News:  अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले त्याच एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला,  पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून तलवारीने वार करून खुन केल्याचे आले समोर.

murder of a young man by stabbing him with a sword, a sensational incident

अहमदनगर:  कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले त्याच एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे तर शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे.

काल (सोमवारी) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे.

गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, मध्यरात्री फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. मयत ओंकार भागानगरे याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ओंकार भागानगरे याच्या नातेवाईक व मित्रांनी रूग्णालयात गर्दी केली आहे. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे असून या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून ओंकार भागानगरे याचा तलवारीने वार करून खुन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: murder of a young man by stabbing him with a sword, a sensational incident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here