Home अहमदनगर अहमदनगर: उड्डाणपुलावर ट्रकची कारला धडक; दुचाकीस्वार ..

अहमदनगर: उड्डाणपुलावर ट्रकची कारला धडक; दुचाकीस्वार ..

Ahmednagar Accident:  पुलावर अपघातांची मालिका : रायगड येथील कुटुंब बचावले.

Accident Truck collides with car on flyover bike rider

अहमदनगर: येथील उड्डाणपुलावरून : औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन कारचे नुकसान झाले, तर मोटारसायकलस्वारासह दोघे जण जबर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. २५) दुपारी जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी ट्रक चालकावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार सुरेश इरमल व प्रथमेश राजू आडेप (रा. माळीवाडा, नगर) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत अनिल बबन वानखेडे (रा. पिंपरी चिचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक योगेंद्र

पुंडलिक शिंदे (उंबरखेड, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल वानखेडे हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर येथील उड्डाणपुलावरून औरंगाबादच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एम. एच. १८, बी.जी. ५७४७) त्यांच्या इनोव्हा कारला (एम. एच. १४, इपी ५६३१) जोराची धडक दिली. त्यानंतर या ट्रकने काही अंतरावर असलेल्या वॅगनारला (एम. एच. ४३, डीयू १९३), तसेच पुढे असलेल्या मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकस्वारासह दोघे जबर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेले हे दोघे नगरमधील आहेत. हा अपघात पाहण्यासाठी पुलावर बघ्यांनी गर्दी केली होती.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

हद्दीवरुन पोलिस ठाण्यांत वाद

■ नगर शहरातून जाणारा पुणे ते औरंगाबाद हा रस्ता चांदणी चौकापासून ते शेंडी बायपासपर्यंतचा दोन्ही बाजूचा रस्ता भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. सदर अपघात जीपीओ चौकात झाला. गस्तीवर असलेल्या कोतवाली पोलिसांनी कार चालकासह दोन कार, तसेच मोटारसायकल कोतवाली पोलिस ठाण्यात आणली. त्यामुळे कार मालकांसह मोटारसायकलस्वारांचे नातेवाईकही कोतवाली पोलिस ठाण्यात आले.

■ त्यांनी ट्रक मालकाला बोलावून घेण्याचा आग्रह धरला. पोलिस व कार मालक यांच्यात बराच वेळ चर्चा सुरु होती. काही वेळानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, हा अपघात भिंगार कॅम्प हद्दीत झाल्याचा ठाणेदारांना साक्षात्कार झाला.

■ त्यांनी तत्काळ भिंगार पोलिसांना बोलावून घेतले. ही माहिती मिळताच भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे कोतवाली पोलिस ठाण्यात आले व त्यांनी कार मालकांशी चर्चा केली.

पुलावरून ट्रक खाली उतरविण्याची घाई

अपघात झाल्यानंतर ठेकेदाराचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची माहिती घेऊन चालकास ट्रक पुलाखाली घेण्यास सांगितले. त्यामुळे वाहन चालकांचाही चांगलाच गोंधळ उडाला होता.

Web Title: Accident Truck collides with car on flyover bike rider

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here