Home क्राईम Raid:  संगमनेरात बेकायदेशीर कत्तलखाण्यावर पोलिसांचा छापा

Raid:  संगमनेरात बेकायदेशीर कत्तलखाण्यावर पोलिसांचा छापा

Ahmednagar, Sangamner Police Raid: संगमनेर पोलिसांचा मोगलपुरा येथील कत्तलखाण्यावर छापा, २५० किलो मांस जप्त, एकावर गुन्हा दाखल.

Police raid illegal slaughterhouse in Sangamner

संगमनेर: शहरातील मोगलपुरा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखाण्यावर सकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये 62 हजार 500 रुपये किमतीचे 250 किलो गोवश जातीच्या जनावरांचे मांस जप्त (Seized) करण्यात आले. या प्रकरणी एक जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत. शहरातील मोगलपुरा परिसरात मांसाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोगलपुरा  परिसरात जाऊन छापा (Raid) टाकला. मोगलपुरा येथे अलीम जलील कुरेशी हा त्या पत्र्याचे रोडमध्ये कत्तल केलेले मांस विक्री करताना आढळला.

पोलिसांनी या ठिकाणी असलेल्या पत्र्याची शेडची पाहणी केली असता त्या ठिकाणी कत्तल केलेले जनावरांचे मांस दिसुन आले. पोलिसांनी या कारवाई मध्ये 62 हजार 500 रुपये किंमतीचे गोवश जनावरांचे कत्तल केलेले 250 किलो मांस, एक लोखंडी कुर्‍हाड, मांस कापण्याकरीता वापरलेला एक सुरा असा एकुण 63 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

याबाबत पोलीस नाईक कचरु उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अलीम जलील कुरेशी (रा. मोगलपुरा, संगमनेर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत 1995 चे कलम 5 (अ), 5 (क) 1 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid illegal slaughterhouse in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here