Home Accident News Accident: दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात

Accident: दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात

Accident Two motorcycles collided head-on

श्रीरामपूर | Accident: तालुक्यातील खैरी निमगांव येथील हरेगाव कॉर्नरजवळ दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात  तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार  येथे दाखल करण्यात आले आहे. यामधील दोघांना नगर येथे हलविण्यात आले आहे.

श्रीरामपूरहून येणाऱ्या MH १५ GT ८६३१ बजाज सिटी १०० या गाडीने गोंडेगाव येथील महावितरण कर्मचारी दादासाहेब थोरात आणि भाऊसाहेब थोरात हे MH१७ CN ६३३४ या हिरो स्प्लेंडर प्लसला श्रीरामपूरकडे जात असताना समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला.

हरेगाव कॉर्नर या ठिकाणी तसेच त्यापुढे हायस्कुल असल्याने याठिकाणी गतीरोधकांची आवश्यकता आहे. तसेच श्रीरामपूर – पुणतांबा रस्ता वळणाचा असल्याने येथे दिशादर्शक फलक आहेत. मात्र तेथे अनेक ठिकाणी झाडामुळे दिसत नाहीत. याबाबत बाधंकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Accident Two motorcycles collided head-on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here