Home अहमदनगर Crime News: कांदा व्यापाऱ्यास घातला दीड कोटीस गंडा

Crime News: कांदा व्यापाऱ्यास घातला दीड कोटीस गंडा

Crime News One and a half crore fraud was given to the onion trader

अहमदनगर | Ahmednagar | Crime News:  शहरातील एका कांदा व्यापाऱ्यास  परराज्यातील चार जणांनी दीड कोटी रूपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.  व्यापारी गणेश मुरलीधर तवले (रा. तवलेनगर, औरंगाबाद रोड, नगर) यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तवले यांनी फिर्याद दाखल केली असून  दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुजय बेलूर,  प्रसाद के., स्टीफन प्रवीणकुमार, मांतेश पाटील (चौघे रा. बंगळुरू, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

व्यापारी तवले शेतकर्‍यांकडून कांदा खरेदीकरून परराज्यातील व्यापार्‍यांना पाठवितात. तवले यांची कर्नाटकच्या तस्करबेरी अ‍ॅग्री व्हेंचर या कंपनीच्या चार जणांशी ओळख झाली. त्यातील दोघे तवले यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यांनी तवले यांना कर्नाटकमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर तवले हे त्यांचे व्यवहार पाहणारे नितीन पवार यांच्यासह सदर कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयात गेले.

तेथे त्यांच्यात व्यवसायाबाबत चर्चा झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सात कोटी सात लाख 29 हजार 686 रूपयांचा माल त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या कंपनीला वेळोवेळी पाठविला. कंपनीकडून पाच कोटी 53 लाख 83 हजार 551 रूपये हे तवले यांना त्यांच्या गणेश ट्रेडिंग फर्मच्या खात्यावर पाठविण्यात आले मात्र उर्वरित 1 कोटी 50 लाख 46 हजार 135 रूपये मिळावी, यासाठी नेहमी संपर्क करण्यात आला. ते तीन वेळा बंगळुरू येथेही जाऊन आले. शेवटी व्यापारी तवले यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.

Web Title: Crime News One and a half crore fraud was given to the onion trader

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here