Home क्राईम संगमनेर तालुक्यात दोघांना गजाने व काठीने मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात दोघांना गजाने व काठीने मारहाण, गुन्हा दाखल

Crime News Sangamner taluka, two were beaten with sticks

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे एकास गजाने व काठ्याने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तार कासम शेख व असिफ शेख यांना मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी सत्तार कासम शेख यांनी रा. शिबलापूर यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून सोमनाथ माणिक चव्हाण, नितीन बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब माणिक चव्हाण, अलका चंद्रकांत शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  घरासमोर रोडवर सोमनाथ चव्हाण याने फिर्यादीचा भाऊ पीरमोहम्मद कसम शेख यास शिवीगाळ केली असताना सत्तार शेख हा सोमनाथ यास म्हणाला की, तू आमच्या घराकडे बघून शिवीगाळ करू नकोस याचा त्यास राग आल्याने त्याने गजाने गुडघ्यावर व खांद्यावर मारहाण केली. तसेच नितीन चव्हाण याने देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा पुतण्या असिफ यास देखील आरोपींनी गजाने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास आश्वी पोलीस सहायक फौजदार एस. एस. पवार हे करीत आहे.

Web Title: Crime News Sangamner taluka, two were beaten with sticks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here