Home अहमदनगर बारावीचा पेपर देण्यासाठी चाललेल्या दोघा सख्या बहीण भावाचा पिकपच्या धडकेत मृत्यू

बारावीचा पेपर देण्यासाठी चाललेल्या दोघा सख्या बहीण भावाचा पिकपच्या धडकेत मृत्यू

Accident Two siblings, who were on their way to hand over their 12th standard papers, died

श्रीगोंदा | Shrigonda:  बारावीचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या  दोघा सख्या बहीण भावाचा पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात (Accident) होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी  ही घटना घडली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील शिंदे कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करते. त्यांची मोठी मुलगी अनुष्का गणेश शिंदे दौंड मेमोरियल या शाळेत शिक्षण घेत होती.

सध्या १२ वीचे पेपर चालू आहेत. त्या पेपरसाठी सकाळी आपला भाऊ आदित्य गणेश शिंदे यांच्यासोबत निमगाव खलू वरून बहिणीचा पेपर देण्यासाठी दुचाकीवर सकाळी नऊ च्या सुमारास जात असताना पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अनुष्का गणेश शिंदे वय १६,व आदित्य गणेश शिंदे वय १४ रा निमगाव खलु,ता श्रीगोंदा अशी अपघातात मयत झालेल्या बहिण भावांची नावे आहेत.  वडील हे पेंटर  व शेती काम करीत असतात. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. या गरीब  गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करून अंत झाल्यामुळे निमगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.  या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक  तपास दौंड पोलीस करत आहेत.

Web Title: Accident Two siblings, who were on their way to hand over their 12th standard papers, died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here