Home अहमदनगर Accident: कार व रिक्षात भीषण अपघात, रिक्षाचे दोन तुकडे, पाच जण जखमी

Accident: कार व रिक्षात भीषण अपघात, रिक्षाचे दोन तुकडे, पाच जण जखमी

Accident Car and rickshaw crash, two pieces of rickshaw

Rahuri | राहुरी:  राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर  उंबरे-माळवाडी येथे कार व रिक्षा यांच्यात भीषण अपघात (Accident)  झाला. या अपघातात पाच वर्षाच्या मुलीसह पाच ते सहाजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजेच्या  सुमारास घडली.

राहुरीकडून सोनईच्या दिशेने चाललेल्या (एमएच 12 जीवाय 3818) या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा ( एमएच 16 एजे 8748) ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचे जागीच दोन तुकडे झाले. रिक्षात बसलेले प्रवासी त्यात तीन महिला एक पाच ते सहा वर्षाची मुलगी व एक पुरुष असे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा अपघात काल सकाळी  सकाळी साडेअकराच्या सुमारास (Accident) घडला.

अपघात इतका भीषण होता की, दोघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर इतर गंभीर जखमी झाले आहेत उंबरे गावातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ राहुरी  येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

Web Title: Accident Car and rickshaw crash, two pieces of rickshaw

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here