Home महाराष्ट्र नवस फेडायला जाताना अपघात, पाच ठार

नवस फेडायला जाताना अपघात, पाच ठार

Breaking News | Accident: घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पुलावरून खाली कोसळला.

Accident while going to take vows, five killed

यवतमाळ: नवस फेडायला जात असताना पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरून ऍपे वाहन कोसळून भीषण अपघाताची घटना घडली. हा अपघात दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला.

या अपघातात चार महिला आणि एक पुरुष असे पाच जण ठार झाले, तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन, तीन लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण पुसद तालुक्यातील मोहा तांडा, गोकी तांडा व पांढुर्ना गावातील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ते मालवाहू ऍपे वाहनात बकरा घेऊन वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नवस फेडायला जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पुलावरून खाली कोसळला. वाहनामध्ये जवळपास १५ ते २० लोक असल्याची माहिती आहे. पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत असून अधिक तपास करीत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident while going to take vows, five killed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here