संगमनेर: अवैध दारू वाहतूक पकडली, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
Breaking News | Sangamner: पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात एक इसम देशी, विदेशी दारुची अवैध वाहतूक करतांना मिळून आला.
संगमनेर: संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सावरचोळ येथे रानवारा हॉटेल जवळ तालुका पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात एक इसम देशी, विदेशी दारुची अवैध वाहतूक करतांना मिळून आला. याप्रकरणी अजय शांताराम वाकचौरे (रा. निंब्रळ, ता. अकोले) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या ताब्यातून दोन लाख ४७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुगाव फाटा वरून शिरसगाव धुपे मार्गावर असणाऱ्या रानवारा हॉटेल या ठिकाणी अवैध पध्दतीने देशी – विदेशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पो. नि. देवीदास ढुमने यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानूसार पोलीसांनी छापा टाकला असता आरोपी अजय वाकचौरे हा देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आला. यावेळी पोलिसांनी खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. १०,५०० रुपयाच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ३०० सीलबंद बाटल्या, ४०,३२० रुपयाच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या १८० मीलीच्या ५७६ सीलबंद बाटल्या, ३६०० रुपयाच्या ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या २४ सीलबंद बाटल्या, ३८४० रुपयाच्या इंपिरियल ब्ल्यू कंपनीच्या २४ सीलबंद बाटल्या, ४३२० रुपयाच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या २४ सीलबंद बाटल्या, ४३२० रुपयाच्या रॉयल चॅलेंज कंपनीच्या २४ सीलबंद बाटल्या, ३६०० रुपयाच्या मॅकडॉल कंपनीच्या २४ सीलबंद बाटल्या, ४२०० रुपयाच्या ब्लॅक डीलक्स कंपनीच्या बंद बाटल्या, २००००० रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट झेडडीआय वाहन क्रमांक एमएच ४८-८२८३ असा एकूण २,४७,७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Web Title: Illegal liquor traffic caught, goods worth 2.5 lakh seized
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News