Home पुणे ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन तरुणी जाळ्यात

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन तरुणी जाळ्यात

Breaking Crime News: संपूर्ण वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरु होता. (Sex Racket)

Online sex racket busted, Rajasthani actress along with two Russian girls in the net

पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने एका टॉप मॉडेलसह दोन रशियन तरुणींना विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेलमधून वेश्याव्यवसाय (Prostitutions) करताना रंगेहाथ पकडले. यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री असल्याचे सांगण्यात येते. मात्र तपासल्यानंतर या तिघींनाही अटक केले नाही तर त्यांना रेस्क्यू करण्यात आले. आरोपी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन संन्याशीं याचा शोध पोलीस घेत आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून राजस्थानी अभिनेत्री पुण्यात वास्तव्याला होती. पुण्यातील वेगवेगळ्या आणि उच्चभृ हॉटेलमध्ये तिचे वास्तव्य होते. तर इतर दोन रशियन मॉडेल यादेखील पुण्यातील उच्चभु हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या. वेशा व्यवसायाचं हे मॉडेल संपूर्णतः ऑनलाइन होतं. विदेशात आणि भारतातल्या वेगवेगळ्या शहरात बसून यातील दलाल ऑनलाईन व्यवहार करायचे. एकदा का ग्राहक सापडला की त्याच्याशी व्हाट्सअप वरून संपर्क साधायचे. व्हाट्सअपवरच या मॉडेलचे फोटो त्यांना पाठवले जायचे. या मॉडेलच्या मोबदल्यात काही तासासाठी हजारोंच्या घरात पैसे घेतले जात होते. एकदा का पैसे संबंधित दलाच्या खात्यात जमा झाले त्यानंतरच संबंधित मॉडेल तरुणीला बुक केलेल्या उच्चभ्रू हॉटेलमध्येच पाठवले जायचे.

दरम्यान क्राइम ब्रँचच्या पोलिसांना या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरातील एका उच्चभृ हॉटेलमध्ये धाड मारण्यासंदर्भात ऑर्डर दिली होती. त्यानंतर क्राईम ब्रँचच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्राहक असल्याचा खोटा कॉल केला. त्याने टॉप मॉडेलची मागणी केली. यानंतर दलाल असलेल्या व्यक्तीने अनेक फोटो व्हाट्सअप वर पाठवले. क्राइम ब्रँचच्या या कर्मचाऱ्यांनी यातील एक फोटो सिलेक्ट केला. सिलेक्ट केलेली तरुणी ही राजस्थानी अभिनेत्री होती. त्यानंतर विमानतळ परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ही भेट ठरली होती. ठरल्यानुसार सगळं झालं अन् ही अभिनेत्री त्या हॉटेलमध्ये आली. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या क्राईम बँचने धाड टाकली आणि तिला ताब्यात घेतलं. त्याचवेळी कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमधून दोन रशियन तरुणींनाही ताब्यात घेतले. या सर्व तरुणींची रवानगी आता रेस्क्यू होम मध्ये करण्यात आली. राजस्थानी अभिनेत्री असलेल्या या तरुणीची अशी काय मजबुरी होती की तिने हा पेशा पत्करला? याचा अधिक  तपास आता क्राईम ब्रँचचे पोलीस करत आहेत. सदर घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Online sex racket busted, Rajasthani actress along with two Russian girls in the net

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here