अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी या अभिनेत्याला अटक
मुंबई | Crime: बेपनाह प्यार, फिर भी ना माने, बत्तमिज दिल, ब्रम्हराक्षस, मेरी सासू मेरी मा, नागीण अशा मालिकामध्ये गाजलेला अभिनेता पर्ल पुरी याला पाच वर्षीय मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये कामन वालीव परिसरात एका मालिकेचे चित्रीकरण करत असताना एका महिला अभिनेत्रीने आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह सेटवर आली होती. महिलेच्या मालिकेचे भागाचे चित्रीकरण सुरु असताना पर्ल पुरी याने या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार केला. या मुलीने यासंदर्भात पालकांना सांगितले तेव्हा पर्ल पुरीविरोधात २०१९ मध्ये गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तब्बल दोन वर्षांनी तपास करत शुक्रवारी रात्री पुरी याला मुंबईतून अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असून वसई न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Web Title: actor pearl puri was arrested for torturing a minor girl crime Filed