Home क्राईम पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध,  कुणकुण लागताच नवऱ्याची हत्या

पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध,  कुणकुण लागताच नवऱ्याची हत्या

affair with husband's friend, murder of husband

वर्धा | Murder Case : वर्धा शहरातील नवीन आष्टी परिसरात राहणाऱ्या जगदीश देशमुख याला मारहाण करीत गळा चिरून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे.  त्यांनतर मृतदेह गोणीत भरुन रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी जगदीशची पत्नी दीपाली देशमुख,  तिचा प्रियकर शुभम जाधव आणि त्यांना मदत करणारा शुभमचा भाचा विजय माने या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ११ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जगदीशचा खून करून मृतदेह अप्पर वर्धा धरणात फेकण्याचा योजना होती मात्र वाटेत पोलीस गस्त घालत असल्यामुळे त्यांची योजना फसली आणि त्यांना मृतदेह रस्त्यात टाकून पळ काढला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  मयत जगदीश देशमुख (वय 35) याचे आरोपी शुभम जाधव याच्याशी मैत्री होती. शुभम हा दीपालीला भेटण्याच्या बहाण्याने जगदीशच्या घरी येण्याचा प्रयत्न करीत असत.  काही दिवसांनी दोघांत दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यावरुन शुभम आणि जगदीशमध्ये वाद झाले. जगदीशच्या आईलाही याची कुणकुण लागली. याबाबत त्यांनी ही गोष्ट जगदीशच्या बहिणीला माहिती दिली होती. यामुळे पोलिसात तक्रार करणार असल्याची चर्चा होती.

दीपाली आणि प्रियकर शुभम हे दोघे आर्वी येथे काही महिने सोबत राहत होते. बहीण-भाऊ असल्याचा बनाव करत भाड्याच्या खोलीत ते राहत होते. घरमालकाला खोटे सांगून एकत्र राहिले.  मात्र त्यांच्यात बहीण-भावाचं नातं नसल्याचे घरमालकाला समजल्याने त्यांनी त्या दोघांना घराबाहेर काढले. त्यानंतर दीपाली पुन्हा आष्टीला येऊन जगदीशकडे राहू लागली.

या काळात जगदीशच्या आईची तब्येत बिघडल्याने तिने अंथरुण धरले. याचा फायदा घेत जगदीशची पत्नी दीपाली, तिचा प्रियकर शुभम जाधव, शुभमचा भाचा विजय माने या तिघांनी हत्येचा कट रचला.

तीन फेब्रुवारीच्या रात्री जगदीशची हत्या करण्यात आली. विजय माने याने दिलेल्या माहितीनुसार, जगदीशची हत्या करून मृतदेह अप्पर वर्धा धरणात फेकण्याचा प्लॅन होता. जगदीशचा मृतदेह पोत्यात भरल्यानंतर मामा-भाचा आणि दीपाली हे पोते घेऊन अप्पर वर्धा धरणाच्या दिशेने जात होते. मात्र परिसरात पोलीस गस्त घालत होते. यामुळे जगदीशचा मृतदेह वाटेत फेकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.. मृतदेह रस्त्यावर फेकून तिघे जण लपून बसले. आणि पोलीस जाण्याची वाट पाहत होते. काही वेळाने दिवस उजाडल्यावर फिरायला आलेल्या लोकांना जगदिश रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी तपासणी केली. त्यानुसार पत्नी दीपालीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. प्रियकर शुभम जाधवचे नाव समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली.

Web Title: affair with husband’s friend, murder of husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here