Home अहमदनगर शेवगाव पोलिस ठाण्यातील कोठडीत पाच आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

शेवगाव पोलिस ठाण्यातील कोठडीत पाच आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Corona positive report of five accused in Shevgaon police station

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: शेवगावच्या पोलिस ठाण्यातील कोठडीत विविध गुन्ह्यांतील २८ आरोपी ठेवण्यात आलेले आहेत. यामधील पाच आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या आरोपींना उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात येणार आहे.

केवळ तीन कोठड्या असल्याने या आरोपींना इतर आरोपींपासून विलगीकरण ठेवण्यासाठी पोलिसांची मोठी कसरत होत आहे. शेवगाव पोलिस ठाण्यातील तीन कोठड्यांत विविध गुन्ह्यांतील २७ पुरुष व एक महिला, असे २८ आरोपी आहेत. कोठडीच्या लोखंडी सळया, जाळ्या जीर्ण झाल्याने व भिंतीला ओलावा लागल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी येथील कैदी इतरत्र हलविण्याची पोलिस प्रशासनाची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे. कोठड्यांची दुरुस्ती करण्यासाठी तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाकडून सार्वजनिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार येथील आठ कैद्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तसेच  तीन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पाच आरोपींना तातडीने अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचा अहवाल पत्रव्यवहार देखील देण्यात आला आहे.

Web Title: Corona positive report of five accused in Shevgaon police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here