Home क्राईम तिच्यासाठी तो जेलमध्ये गेला अन जामिनावर बाहेर येताच….

तिच्यासाठी तो जेलमध्ये गेला अन जामिनावर बाहेर येताच….

Crime News: अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या तरुणाचे भयानक कृत्य.

After being released on bail, he seduced the same girl once again

बीड: एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणास तुरुंगवारी घडली. मात्र जामिनावर सुटका झाल्यावर जिच्यामुळे कारागृहात राहावे लागले, तिला घेऊन त्याने पुन्हा पलायन केले. हा प्रकार बीडच्या  आष्टी तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

तेजस असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तेजसवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी झाली. मात्र जामिनावर सुटल्यावर त्याच मुलीला त्याने पुन्हा एकदा फूस लावून पळवल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बीडच्या आष्टी ठाण्यात तेजसवर पुन्हा एकदा अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: After being released on bail, he seduced the same girl once again

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here