Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात

अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी (Rationing grain in black market) जाताना पकडल्याचे प्रकार मागील आठवडाभरात मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत.

Rationing grain in black market in various taluks of Ahmednagar new.jpeg

पाथर्डी: तालुका पुरवठा विभाग व पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून रेशनिंगचा खुल्या विक्रीसाठी चालेला एक लाखााचा 35 क्विंटल तांदुळ पकडला आहे. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत.

चालक बाळकीसन दुर्गाजी देवकर (रा टाकळीमानूर, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. अकोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 26 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता तहसिलदार शाम वाडकर यांना माहीती मिळाली की, मार्केट यार्ड पाथर्डी येथे एक रेशनिंगची बेवारस गाडी उभी आहे. त्यानुसार नायब तहसिलदार मुरलीधर बागुल, तलाठी हरीभाऊ सानप यांना मार्केट यार्ड येथे छापा टाकून पिक अप गाडी (नं एम एच 23 डब्लु 3139) तपासणी केली.

गाडीमध्ये रेशनिंगचा माल दिसुन आल्याने पिक अप गाडी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. त्यानंतर दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पिकअप गाडीतील मालाची पाहणी करुन वाहन चालकाकडे चौकशी करुन तपासणीसाठी सँम्पल घेण्यात आले. गाडीतील तांदुळ रेशनिंगचा असून तो इतर बारदान्यात भरल्याचे दिसून आले. एकुण 60 गोण्या असुन वजन अंदाजे 35 क्विंटल आहे त्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे. तर पोलीसांनी 3 लाख रूपये किंमतीची पिक अप गाडी जप्त केली आहे.

वाहन चालक बाळकीसन दुर्गाजी देवकर रा टाकळीमानूर ता पाथर्डी जि अ.नगर याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा तांदुळ हा मार्केट कमीटी मध्ये खरेदी केला असुन त्याने खरेदी केल्याचे पावत्या प्रशासनाला दाखविल्या त्या पाहता त्या जुन्या मागील तारखेच्या दिसुन आल्या आहेत. पिक अप गाडीमध्ये असलेला तांदुळ हा रेशनिंगचा असल्याचा संशयावरून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

जामखेड: भुम तालुक्यातील ईटा येथून नगरकडे जाणार्‍या संशयास्पद ट्रकला अडवून त्यातील काळ्या बाजारात जाणारा अडीच लाखाचा 15 टन तांदूळ जप्त करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. ट्रकसह एकुण 10 लाख 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीसांनी जप्त केला आहे.

याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि.24) रात्री जामखेड पोलीसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना रात्री 11:15 वाजेच्या सुमारास अहमदनगर रोडवरील हिमालय पेट्रोलपंप येथे मालट्रक (क्र. एम.एच.15 सी.के.0191) संशयितरित्या जाताना दिसला. यामुळे ट्रक थांबवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने शिवाजी बबन गफाट, (37, रा. इंदापुर ता. वाशी. जि. उस्मानाबाद) असे सांगितले. वाहनात काय आहे असे विचारले त्याने सदर ट्रक मध्ये 210 तांदळाच्या गोण्या असल्याचे सांगितले.

Earn Money Online | बना लखपती ऑनलाईन काम करून, फक्त करा हे काम, एकदम सोपे आणि सहज मार्ग

त्यास सदर तांदळाची पावती आहे का? अशी चौकशी केली असता त्याने के. बी. वाघवकर वेट ब्रीज येथील पावती दाखवली ज्यात मालाचे वजन 14990 किलो असल्याचे दिसुन आले. हा माल अमर वसंत लवटे धंदा-व्यापार, (रा. ईंट ता. भुम.जि. उस्मानाबाद) यांचे आडत दुकानातुन भरलेला असुन एमएजीआर सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले. परंतु हा तांदुळ पांढर्‍या रंगाच्या गोणीत असल्याने त्याच्यी पाहणी करता तो सार्वजिनक वितरणाचा असल्याबाबत संशय आला. पोलीसांनी रात्रीच्या वेळेस जामखेड पोलीस स्टेशन येथे ट्रक आरक्षित केला व त्याबाबत चालकास लेखी समज दिली.

याबाबत जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे चौकशी केली असता या बाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संशयित वाहनाची चौकशी करून कार्यवाही करावी व महसुल विभागास कळवावे असा अभिप्राय दिला. याप्रकरणी चालकाची पुन्हा विचारपुस केली असता सदरील तांदुळ हा केडगाव रेशनचा असून तो अहमदनगर येथे घेवून जात असल्याचे निषपन्न झाले.याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस कर्मचारी अरुण पवार, संजय लोखंडे, संदिप राऊत, संदिप आजबे, अनुराधा घोगरे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना पकडल्याचे प्रकार मागील आठवडाभरात मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत.

Web Title: Rationing grain in black market in various taluks of Ahmednagar 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here