अहमदनगर जिल्हा करोना अपडेट: ६१७ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ६१७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सध्या ९० टक्केपेक्षा जास्त रुग्ण बरे होताना दिसत आहे.
आज बरे झालेले रुग्ण यामध्ये अकोले २१, मनपा ११९, जामखेड ३७, नगर ग्रामीण ६७, कोपरगाव २७, पारनेर २२, नेवासा ४६, राहता ५९, पाथर्डी २२, संगमनेर ५६, राहुरी ४८, श्रीगोंदा २८, शेवगाव २६, श्रीरामपूर ३४, मिलिटरी हॉस्पिटल १, कॅन्टोनमेंट ३ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
मनपा व संगमनेर तालुक्यातील अधिक रुग्ण आज बरे झाले आहेत. जिल्ह्यात करोनाला ब्रेक लागल्याचे चित्र ह्या आठवड्यात दिसून आहे. बाधितांची संख्या कमी झाली असून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 617 patient discharge