Home अहमदनगर उस तोडणी वाहतूक संघटनांचा विविध मागण्यांसाठी नगरमध्ये संप

उस तोडणी वाहतूक संघटनांचा विविध मागण्यांसाठी नगरमध्ये संप

Ahmednagar Strike demands of sugarcane harvesting associations

अहमदनगर | Ahmednagar: उस तोडणी मजूर, वाहतूकदार, मुकादम तसेच सर्व उस तोडणी संघटनांनी एकत्र येऊन दरवाढ करण्यासाठी संप केला आहे. वाहतूकदारांनी नगर पुणे रोडवरील सक्कर चौक येथे वाहने रांगेत उभी केली आहे. दरवाढ झाल्याशिवाय वाहने येथून हालणार नाहीत असे संघटनांनी इशारा दिला आहे.

तसेच दरवाढ व विविध मागण्या मान्य होईपर्यंत एकही मजूर कारखान्यावर उस तोडणीसाठी जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उस तोडणी वाहतूकदार संघटना विविध मागण्या:

उस वाहतुकीच्या दरात १५० टक्के वाढ करावी.

मुकादमाचे कमिशन १८.५ टक्क्यावरून ३७ टक्के करण्यात यावे.

सर्व कारखान्यांना १०० टक्के शौचालय असल्याशिवाय परवाना देऊ नये.

कारखान्यावर उस तोडणी मजूर नेणे आणणे खर्च कारखाना यांनी करावा.

मजुरांचा व बैलांचा विमा कारखान्याने भरावा.

वाहतूकदारांचा करार हा तीन वर्ष करण्यात यावा.

उस तोड मजुरांसाठी कामगार कायदा लागू करावा.

राज्यसरकारने मजुरांसाठी कोविड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे.

उस तोडणी मजूर व बैल आरोग्य उपचार करण्यात यावेत.

शासनाद्वारे जिल्हाधिकार्यांनी उस तोड मजुरांची नोंदणी करावी.

अशा विविध मागण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Strike demands of sugarcane harvesting associations

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here