Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आणखी एकाचा करोनाने मृत्यू

Akole: अकोले तालुक्यात आणखी एकाचा करोनाने मृत्यू

Akole Taluka 24th death corona

अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी २७ करोनाबाधित आढळून आले तर एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १७४९ झाली. तर तालुक्यातील २४ वा बळी काल गेला आहे.

तालुक्यातील देवठाण येथील ७० वर्षीय पुरुषाचा संगमनेर येथील घुलेवाडी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरुषास श्वसनाचा अधिक त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच जिल्ह्यात काल पाच रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ७४१ इतकी झाली आहे तर तालुक्यात आत्तापर्यंत २४ बळी ठरले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka 24th death corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here