Home अहमदनगर अहमदनगर: बस व टेम्पोचा भीषण अपघात, चालक ठार- Accident

अहमदनगर: बस व टेम्पोचा भीषण अपघात, चालक ठार- Accident

Ahmednagar Accident Bus and Tempo crash kills driver

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: शेवगाव गेवराई राज्य मार्गावर राक्षी येथे एसटी बस व टेम्पो यांच्या शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे.

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर महामंडळाची अहमदनगर- पुसद ही नव्याने सुरू झालेली एसटी बस आज शनिवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास शेवगावहुन -गेवराईच्या दिशेने जात असताना राक्षी नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर चापडगावहुन शेवगावच्या दिशेने जाणारा फळ माल वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाल्याने अपघात झाला.

यामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला तर एसटी बस चालक भोपालसिंग जाणूसिंग पवार (रा पुसद जि यवतमाळ) व बसमधील प्रवासी आकाश भगवान रोठे (रा बीबी ता लोणार जि बुलढाणा) हल्ली नेवासा पंचायत समितीचे कर्मचारी हे अपघातात जबर जखमी झाले. तर वाहक संतोष सीताराम आढाव व इतर प्रवाश्यांना जबर मार लागला आहे. जखमींवर शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

Web Title: Ahmednagar Accident Bus and Tempo crash kills driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here