Home Accident News Accident: घाट परिसरात दुचाकीस्वराला अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू

Accident: घाट परिसरात दुचाकीस्वराला अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू

Ahmednagar Accident unidentified vehicle crushed a two-wheeler in Ghat area

अहमदनगर |  Ahmednagar Accident: नगर मनमाड रोडवरील विळद घाट परिसरात रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना दिनांक १२ डिसेंबर रोजी रात्री घडली. या अपघातात (Accident) एका जणाचा मृत्यू झाला असून दिनांक १५ डिसेंबर रोजी अज्ञात वाहनचालाकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या अपघातात विनोद मधुकर गवाळे रा. निंबळक वय ३७ असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात निकिता गवाळे यांनी एमआयसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती गुरुवारी प्रसार माध्यमांना दिली आहे. याबाबत सहायक फौजदार लोखंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.  

Web Title: Ahmednagar Accident unidentified vehicle crushed a two-wheeler in Ghat area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here