Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनामुळे पालक गमावलेली या बालकांना मिळणार शासनाची मदत

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनामुळे पालक गमावलेली या बालकांना मिळणार शासनाची मदत

Ahmednagar Children who have lost their parents due to corona 

अहमदनगर | Ahmednagar: सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेली एकूण ८ मुले आहेत. एक पालक गमावलेली १२६ मुले आहेत. मुलांना सामाजिक आधार देण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही बालक वंचित राहू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणेला दिला आहे.

कोरोनामुळे अनेक मुलांचे पालकत्व हिरावले आहे. काही कुटुंबात आई वडील दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा अनाथ झालेल्या मुला मुलीची अगदी गाव पातळीपासून माहिती संकलित करून ती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे देण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरावर दिले आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या पालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे संगोपन या दृष्टीने उपाय योजना व मदत मिळावी म्हणून कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत करता येणार आहे.

Web Title: Ahmednagar Children who have lost their parents due to corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here