अहमदनगर करोना अपडेट: जाणून घ्या कोठे किती आढळले आज बाधित
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात काल शनिवारी सायंकाळी ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २५६ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या दोन हजार २५६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ८८ बाधित, खासगी प्रयोगशाळेत ६१ तर अॅटीजेन चाचणीत १०७ बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ८८ बाधित आढळून आले यामध्ये अकोले १४, कोपरगाव २, मनपा ४२, जामखेड ४, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर २, पाथर्डी ३, राहता १, श्रीगोंदा १५, कॅन्टोनमेंट २ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत ६१ बाधित आढळून आले आहेत यामध्ये अकोले २, नगर ग्रामीण ७, मनपा १७, कर्जत १, पारनेर ४, नेवासा ५, राहुरी ५, राहता ६, पाथर्डी १, श्रीरामपूर ४, संगमनेर ९ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत १०७ बाधित आढळून आले आहेत यामध्ये श्रीगोंदा ३, शेवगाव ३२, पाथर्डी २०, पारनेर १०, नेवासा ४, नगर ग्रामीण ४, कोपरगाव १, कर्जत १४, जामखेड ८, मनपा ११ असे बाधित आढळून आले आहेत.
एकूण करोना बाधितांची संख्या ५३०८३ तर मृत्यू ८०८ इतके झाले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Corona update Today 18 Oct