Home अहमदनगर मोबाईलचा एक्सेस दुसऱ्याला देणे आले एकाच्या अंगलट, दोन लाखांस गंडा

मोबाईलचा एक्सेस दुसऱ्याला देणे आले एकाच्या अंगलट, दोन लाखांस गंडा

Ahmednagar Crime Mobile access was given to another at the fingertips of one

Ahmednagar Crime | अहमदनगर: मोबाईलवर एनी डेस्क अॅप डाऊनलोड करून त्याचा एक्सेस दुसऱ्याला देणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण त्याच्या बँकेच्या खात्यातून २ लाख २३ हजार ४९९ रुपये काढून घेण्यात आल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.

संदीप रामभाऊ आंधळे वय ४७ रा. सावेडी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आंधळे यांना अज्ञात व्यक्तीने फोन वरून एनी डेस्क व टीम व्हीवर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवून बँक खात्यातील रकमेवर गंडा घातला आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ahmednagar Crime Mobile access was given to another at the fingertips of one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here