Home अहमदनगर अहमदनगर: पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेस मारहाण

अहमदनगर: पिस्तुलाचा धाक दाखवत महिलेस मारहाण

Ahmednagar Crime Woman beaten with pistol

Ahmednagar Crime | अहमदनगर: केडगाव उपनगरात राहणाऱ्या घरात घुसून महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देत तिला व मुलास  मारहाण करणाऱ्या आरोपीस  कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  केडगाव उपनगरात राहणार्‍या वंदना अशोक भिंगारदिवे या रविवारी सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना नितीन शेलार त्यांच्या घरात घुसला. तुमचा मुलगा कुठे आहे? असे म्हणत शेलार याने वंदना भिंगारदिवे यांना गावठी कट्टा दाखविला. वंदना यांच्यासह त्यांचा मुलगा अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची माहिती अक्षय याने 112 नंबरवर फोन करून पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत नितीन शेलार यास ताब्यात घेतले आहे. वंदना भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Crime Woman beaten with pistol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here