महिलेस धमकी देत वेळोवेळी बलात्कार: अहमदनगर जिल्ह्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना
Ahmednagar | Shrigonda | श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका गावातील महिलेस जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार (rape) केल्याची घटना घडली असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावाच्या वाडीवर एक कुटुंब शेती करून आपली उपजीविका करत होते. पीडित महिलेचे पती सासरे हे कामासाठी म्हणजे मोलमजुरी करण्यासाठी जात असतात त्यावेळी अचानक दुपारी पीडित महिलेचा दीर घरी आला आणि पीडितेच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि राहत्या घरात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबध केले. हा प्रकार कोणास सांगितला तर सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिली.
27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फिर्यादी व फियादीचे सासू दुसऱ्याच्या शेतात कांदा खुरपणी करण्यासाठी गेले असता दुपारी 2 वाजेच्या सुमारास फिर्यादीचे दीर मोटारसायकल वर आला आणि त्यांना सांगितले की आपले घरी बचत गटाचे अधिकारी आले आहेत त्यासाठी तुला घरी यावा लागेल असे म्हणुन त्याने मला त्याचेकडील मोटार सायकलवर बसण्यास सांगितले व त्यानंतर त्याने मोटार सायकल आमचे घराकडे जाणारे रस्त्याने न घेता दुस – या रस्त्याने घेवुन जात असल्याने फिर्यादी ने त्यास विचारले तु मला इकडे कोठे घेवून चालला असे विचारले असता त्याने मला जीवे मारण्याची धमकी देवुन श्रीगोंदा , चिंभळा मार्गे न्हावरा ता . शिरुर जि.पुणे येथे नेले तेथे त्याने फिर्यादी च्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पायातील चांदीचे जोडवे असे एका दुकानामध्ये 4600 / – रुपयास विकले .
त्यानंतर दिर याने त्याचेकडील मोटार सायकलवर सायं 6 च्या सुमारास स्वारगेट पुणे येथे नेले. तेथे दिर याने एका लॉज मध्ये एक रुम बुक केला त्यानंतर आम्ही दोघे 29 जानेवारी रोजी सकाळी 09.30 वा पर्यंत आम्ही सदर लॉजमधील रुममध्ये थांबलो असताना दरम्यानचे काळात दिर याने माझेवर वेळोवेळी बळजबरीने संभोग केला आहे . व त्याचेकडील मोटारसायकलवर सायं 6 च्या सुमारास स्वारगेट पुणे येथुन फिर्यादी चे नणंद रा . चिंचणी मोरी ता . शिरुर जि . पुणे हिचे घरी नेले . त्यानंतर फिर्यादी व दिर असे यांनी नणद हीचे घरी असताना रात्रीचे वेळी मी वरील घडलेला प्रकार माझी नणंद यांना सांगितला आहे म्हणुन नणंद यांनी फिर्यादीचे पती , सासरे यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितल्याने दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 09. चे सुमारास फिर्यादीचे पती , सासरा तसेच फिर्यादीचे , आई रा . निंबवी ता . श्रीगोंदा असे फिर्यादीचे घरी आले त्यावेळी दिर याने फिर्यादीचे पती, सासरा भाऊ , आई असे नणंद यांचे घरी येत असल्याचे पाहुन तो तेथुन पळुन गेला आहे .
त्यानंतर मी त्याचदिवशी फिर्यादीचे पती, सासरा, भाऊ व आई यांचे बरोबर श्रीगोंदा येथे आले असुन फिर्यादीचे पती, सासरा, भाऊ व आई यांनापण वरील प्रमाणे घडलेला प्रकार सांगितला आहे. फिर्यादीचे घरी गेल्यानंतर पती यांना सदर प्रकारामुळे टेन्शन आल्याने व ते आजारी पडल्याने आम्ही त्यांचेवर उपचार करून घेतले व त्यानंतर आज रोजी फिर्यादीचे पती , सासरा यांचे बरोबर फिर्याद देण्यासाठी श्रीगोंदा पो.स्टे येथे आले येऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवि ३६६,३७६,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास महेश जानकर हे करत आहेत.
Web Title: Ahmednagar Rape from time to time threatening women