Home महाराष्ट्र बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या ऑनलाइन उपलब्ध

बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या ऑनलाइन उपलब्ध

HSC Board Exam 2022 Online hallticket

HSC Board Exam 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिंक्षण मंडळ पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, १२ वी परीक्षा मार्च २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना online प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या (बुधवारी) दुपारी १ वाजेपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.  हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: HSC Board Exam 2022 Online hallticket

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here