Home अहमदनगर धक्कादायक: शिक्षकाकडून अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक: शिक्षकाकडून अनैसर्गिक अत्याचार

Ahmednagar Crime News Unnatural abused by the teacher

Ahmednagar Crime News | अहमदनगर:  शिक्षक असलेल्या पतीने आपल्या विभक्त झालेल्या पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार (abused) केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षक पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहतात. त्या एका खासगी रूग्णालयात नोकरी करत आहे. जामखेड तालुक्यातील एका जिल्हा परिषद वस्ती शाळेतील शिक्षकासोबत त्यांची ओळख होती. ओळखीतून त्यांनी 18 जुलै 2018 रोजी लग्न केले होते. लग्नानंतर तो शिक्षक पती फिर्यादी यांना त्रास देत असल्याने त्या जामखेड सोडून अहमदनगर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या.

त्या शिक्षकाने तिचा पत्ता शोधून काढत त्या राहत असलेल्या अहमदनगर शहरातील त्यांच्या रूमवर ये-जा वाढविली. 18 जानेवारी 2022 रोजी शिक्षक पतीने तिच्या रूमवर येत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेमुळे पीडिताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून तोफखाना पोलिसांनी पीडितेचा पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News Unnatural abused by the teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here