Home अहमदनगर २ कोटीची फसवणूक करणारा आरोपी नगर जिल्ह्यातून जेरबंद

२ कोटीची फसवणूक करणारा आरोपी नगर जिल्ह्यातून जेरबंद

karjat Accused of cheating Rs 2 crore arrested from Nagar 

Ahmednagar | Karjat | कर्जत:  २ कोटी १० लाखांची फसवणूक करणारा आरोपी कर्जत पोलिसांनी जेरबंद केला आहे. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  केला आहे. २ कोटी १० लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची तक्रार त्याच्याविरुद्ध दाखल आहे. कर्जत पोलिसांनी आरोपीस करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी,  करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप (वय २८ वर्षे, रा. राशीन ता. कर्जत) हा पसार होता. तो  पोलिसांना हवा होता. त्याच्याविरुद्ध भादवि कलम ४२०,४०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ जानेवारी रोजी रात्री गस्तीवरील पोलीस पथकाला तो मिळून आला.

कर्जत पोलिसांनी तात्काळ करमाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना संपर्क करून त्यांच्या ताब्यात दिला. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा तसेच मोठ्या रकमेचा असल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, नितीन नरोटे, अमित बरडे, अण्णासाहेब चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: karjat Accused of cheating Rs 2 crore arrested from Nagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here