Home Ahmednagar Live News Ahmednagar Crime | एकाला गच्चीवरून फेकले तर दुसऱ्यावर तलवारीने वार

Ahmednagar Crime | एकाला गच्चीवरून फेकले तर दुसऱ्यावर तलवारीने वार

Ahmednagar Crime One was thrown from the deck and the other was stabbed

Ahmednagar Crime | अहमदनगर: तुमचा कार्यक्रम करतो असे म्हणत घराच्या गच्चीवरून एकाला खाली फेकले तर दुसऱ्यावर तलवारीने वार करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना पंचवटीनगर येथे सोमवारी रात्री घडली. या मारहाणीत तिघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी ९ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar News)

अंकुश चत्तर, महेश मते, चंदन ढवन, शिवलिंग शिंदे, अक्षय टेकाळे, प्रतिक मगर सर्व रा. बरबडे वस्ती पाईपलाईन रोड, सोन्या कोहक रा. गावडे मळा, अजिंक्य भुजबळ रा. ढववन वस्ती, मयूर सूर्यवंशी रा. पदामानगर सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. या मारहाणीत रोहित मिलन जोशी यांच्यासह अजित बाबर, स्वप्नील सब्बन हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रोहित जोशी यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित जोशी हा त्यांच्या मित्रांसह घराच्या गच्चीवर गप्पा मारत असताना तिथे अंकुश चत्तर हा आला, तो व त्याचे साथीदार इमारतीच्या खाली उभे होते. अंकुश चत्तर हा साथीदारांना म्हणाला गच्चीवर जे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम करा. त्यानंतर आठ ते ९ जण गच्चीवर आले. व रोहित जोशी याला शिवीगाळ करू लागले रोहित याने समजविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन त्यांनी रोहित याच्या पायावार तलवारीने वार केला. अन्य तिघांनी क=लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी रोहितचे पाय धरून त्याला जिन्याच्या पायरीवरून ओढत खाली आणले. अजित बाबर हा भांडण सोडविण्यासाठी पुढे आला असता आरोपींनी त्याला गच्चीवरून खाली फेकले. स्वप्नील याला देखील मारहाण करण्यात आली.   

Web Title: Ahmednagar Crime One was thrown from the deck and the other was stabbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here